भारत देत आहे सर्वात स्वस्त मोबाइल डेटा पॅक : ब्रिटिश रिपोर्ट

बुधवार, 6 मार्च 2019 (11:35 IST)
ब्रिटेनने एका ताज्या अध्ययनात सांगितले आहे की भारत जगभरात सर्वात स्वस्त मोबाइल डेटा पॅक प्रदान करत आहे. रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे की अमेरिका आणि ब्रिटेन आपल्या ग्राहकांना सर्वात महाग डेटा पॅक देत आहे. 
 
किंमत तुलना करणार्‍या वेबसाइट cable.co.uk ला भारतात एक गीगाबाइट (जीबी) डेटाची किंमत 0.26 डॉलर असल्याचे आढळले.
 
ब्रिटेनमध्ये हे 6.66 डॉलरमध्ये उपलब्ध आहे जेव्हाकि अमेरिकेत हे सर्वात महाग 12.37 डॉलरमध्ये मिळतं. अध्ययनात स्पष्ट केले गेले आहे की एक जीबी डेटाची जागतिक सरासरी किंमत 8.52 डॉलर आहे. या रिर्पोटमध्ये विश्वातील 230 देशांच्या मोबाइल डेटाचे तुलनात्मक विश्लेषण केले गेले आहे.
 
आपल्या शोधामध्ये वेबसाइटने म्हटले की भारताची तरुण जनता विशेषकर तांत्रिकदृष्ट्या जागरूक आहे. भारतात स्मार्टफोनची मजबूत स्वीकृती आणि इतर बहुप्रतिस्पर्धी बाजार आहे त्यामुळे डेटा स्वस्त आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती