अशी वाढवा मोबाईलची स्पेस!

मोबाईलची मेमरी संपण्याचे प्रसंग सतत येत असतात. फोनमध्ये भरलेले फोटो, गाणी व्हिडिओमुळे मेमरी पुरता पुरत नाही. अशा वेळी काही टिप्स फॉलो करून  मेमरी वाढवता येईल.
 
* काही अॅप्स एसडी कार्ड किंवा यूएसबी स्टोअरेजमध्ये मूव्ह करता येत नाहीत. सेटिंग्जमध्ये इंडिव्हिज्युअल अॅप्लिकेशनमध्ये जाऊन अशा अॅप्सची माहिती घ्या. ही अॅप्स एकत्र मूव्ह करता येतील. 
 
* नको असलेली अॅप्स अनइस्टॉल करा. 
 
* फोटो गॅलरीतले जुने फोटो आणि व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये घ्या. नको असलेले फोटो डिलिट करा. 
 
* कॅश मेमरी वेळोवेळी क्लिअर करत राहा. 
 
* फॅक्ट्री रिसेटचा अॅप्शन निवड केल्याने फोनची स्पेस वाढायला मदत होईल. 

वेबदुनिया वर वाचा