मोबाईलच्या लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेत बदल

आता एअरटेल व व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांकडून लवकरच लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेत बदल केला जाणार असून ग्राहकांचा मोबाईल फोन कायम वापरात रहावा यासाठी इनकमिंग कॉलवर किमान शुल्क आकारले जाणार आहे.
 
जीओच्या स्पर्धेमुळे या कंपन्यांचा महसूल घटलाच, शिवाय त्यांना सतत आपल्या दरपत्रकातही बदल करणे भाग पडत आहे. परिणामी ग्राहकांना आता फार काळ लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेचा लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे अनेक ग्राहकांना मोठा धक्का बसणार असला तरी मिनिटामिनिटाला येणार्‍या इनकमिंग कॉलसाठी ग्राहकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही. प्रत्येक मिनिटला येणार्‍या इनकमिंग कॉलवर शुल्क आकारणी केली जाणार नाही. काही वैध कालावधीसाठी ग्राहकांनी किमान रक्कम भरुन रिचार्ज केल्यास त्यांना मोफत इनकमिंग कॉल्सचा लाभ घेता येणार आहे.
 
एअरटेलने किमान रिचार्जसाठी  35 रु., 65 रु. व 95 रु. अशा तीन योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेंतर्गत डाटा, टॉकटाईम व 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. याचप्रमाणे व्होडाफोन-आयडिया यांनीही लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेपासून फारकत घेत ग्राहकांसाठी दरमहा किमान 30 रु. शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती