तुम्ही बघितला आहे का केळ्याच्या आकाराचा ‘बनाना फोन ?

गुरूवार, 11 मे 2017 (11:13 IST)
काही लोकांना नवनवीन डिझाइनचे मोबाइल फोन वापरण्याची भारी आवड असते.
 
तुम्हीही अशा लोकांपैकी असाल तर फोनच्या आतापर्यंतचे सर्वात अनोखे व हटके डिझाइन खरेदी करण्यासाठी तयार राहा.
 
मात्र या फोनवर बातचित करतेवेळी तुम्हाला माकडांपासून सावध राहावे लागेल आणि लोकही तुमच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले तर त्याकडेही दुर्लक्ष करावे लागेल. कारण या फोनची रचना एकदम निराळी आहे.
 
खरे म्हणजे त्यास केळ्याच्या फळासारखा आकार देण्यात आला आहे. अमेरिकेतील एक कंपनीने हा हुबेहूब केळ्यासारखा ’बनाना फोन’ तयार केला आहे.
 
येत्या सप्टेंबरमध्ये हा वायरलेस ङ्गोन बाजारात उतरविण्यासाठी कंपनीची तयारी सुरू आहे. हा स्मार्टफोन  नसला तरी त्यास ब्लूट्यूथच्या माध्यमातून स्मार्टफोन सोबत जोडून कॉल केले आणि रिसिव्ह करता येऊ शकतात.
 
त्याची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर दहा तास काम करेल. इंडीगोगो डॉट कंपनीवर या फोनबाबत लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जनमत चाचणी घेतली जात आहे. त्यामध्ये लोक हिरीरीने सहभागी होत आहेत.
 
या ’बनाना ङ्गोन’ची किंमत ४० ते ५० डॉलर म्हणजे सुमारे २७०० ते ३४०० रुपयांदरम्यान असेल. तर मग या नव्या फोनचा अनुभव घेण्यासाठी तयार व्हा.

वेबदुनिया वर वाचा