हलका आणि स्वस्त स्मार्ट फोन जोलो Q900s, पहा त्याचे फीचर्स...

सोमवार, 30 जून 2014 (16:32 IST)
स्मार्टफोनच्या श्रेणीत ज़ोलोने सर्वात हलका फोन ज़ोलो Q900s सादर केला आहे. या स्मार्टफोनचे वजन 100 ग्रॅम आहे. हा फोन आरामात तुमच्या खिशात सामावू शकतो. सॅमसंग गॅलेक्झी S4 मिनीचे वजन 107 ग्रॅम आणि अॅपल आयफोन 5S 112 ग्रॅम आहे.  
 
जोलो Q900s ड्यूल सिमसोबतच विंडोज फोन 8.1 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. 4.7 इंचीच्या डिस्प्लेसोबत एचडी आयपीएस आहे. यात OGS (वन-ग्लास सलूशन) टॅक्नॉलॉजी आणि ड्रॅगन ट्रेल ग्लास प्रोटेक्शन लावलेले आहे. फोनमध्ये 1.2 गीगाहर्ट्‍जचा क्वॉड-कोर स्नॅपड्रॅगन 200 प्रोसेसर आहे. 1 जीबी रॅम आहे. इंटर्नल स्टोरेज 8 जीबी आहे ज्याला मायक्रो-एसडी कार्डने 32 जीबीपर्यंत वाढवू शकता.   
 
फोनमध्ये एलईडी फ्लॅशसोबत 8 मेगापिक्सलचा शानदार कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेर्‍यासोबत वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस सारखे फीचर्सपण या फोनमध्ये आहे. ज़ोलोच्या वेबसाइटवर या फोनची किंमत 11999 रुपये आहे, पण प्री-बुकिंगमध्ये हा तुम्हाला 9999 रुपयाच्या ऑफरमध्ये मिळेल. या फोनची डिलिवरी जुलैच्या महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून सुरू होणार आहे.  

वेबदुनिया वर वाचा