व्हॉट्सअँपवर 'रीड रीसिप्ट'

मंगळवार, 18 नोव्हेंबर 2014 (00:02 IST)
जगभरातील सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये अग्रस्थानी असलेल्या हॉट्सअँपने युर्जससाठी नेहमीच काही तरी नवनवे देऊ केले आहे. आता व्हॉट्सअँपने आणखी एक फिचर 'रीड रीसिप्ट'चा समावेश केला आहे. जर तुम्ही एखादा मॅसेज, फोटो किंवा व्हिडीओ कोणाला पाठविला अन् त्याने तो वाचला किंवा पाहिला असला तरी तुमची फसवणूक करण्यासाठी तो न पाहिल्याचा दावा करतो. अशावेळी आपणही निरुत्तर होतो. 
 
पण आता तसे होणार नाही. व्हॉट्सअँपवरील 'रीड रीसिप्ट' या फिचरमुळे एखाद्या मॅसेज, फोटो किंवा व्हिडीओ पाठविल्यानंतर त्यावर डबल टिक होण्याऐवजी एका विशिष्ट रंगाचे चिन्ह दिसणार आहे. त्यामुळे समोरच्याने तो मॅसेज पाहिल्याची पोचपावतीच मिळणार आहे. 
 
व्हॉट्सअँपवरील युर्जसच्या समस्या, त्यांच्या अडचणी तसेच इतर बाबींना दूर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. पाठवलेला मेसेज त्याला मिळाल्यानंतर मॅसेजच्या समोर टिक केलेले चिन्ह येत असे. त्यावरून लक्षात यायचे की, समोरच्या मॅसेज मिळाला आहे. मात्र तरीही समोरचा व्यक्ती मॅसेज न पाहिल्याचा दावा करत असे. पण 'रीड रीसिप्ट'मुळे मॅसेज न पाहिल्याचे कारण सांगू शकणार नाही. समोरच्या व्यक्तीने मॅसेज वाचल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअँप अकाऊंटसमोर पूर्वी दोन टिक येणार्‍या जागेवर आता निळ्या रंगाचे चिन्ह येणार आहे. 
 
त्यानंतर जेव्हा तो व्यक्ती मॅसेज रीड करेल तेव्हा त्या मॅसेजसमोरील ब्ल्यू रंगाचे चिन्ह ग्रे कलरचे होईल. व्हॉट्सअँपच्या या सुविधेमुळे आता व्हॉट्सअँप युजर खोटे बोलू शकणार नाही. त्याचबरोबर कोणाची फसवणूकदेखील करू शकणार नाही.

वेबदुनिया वर वाचा