लावाच्या फोनचा टॉकटाइम 32 तास

गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (16:57 IST)
लावा इंटरनॅशनलने फ्यूल सिरिज अंतर्गत आपला दुसरा स्मार्टफोन आयरिस फ्यूल 60 बाजारात आणला आहे. याचे खास वैशिष्टय़ म्हणजे 4000 एमएएच शक्तिची बॅटरी आहे. जी तब्बल 32 तासांचा टॉकटाइम देते. 5 इंचाचा स्क्रीनवाला हा फोन एंड्रॉइड आधारित आहे आणि 1.3 जीएचझेड क्वॉड कोर प्रोसेसर आहे. याचा रिअर कॅमेरा 10 एमपीचा ऑटो फोकस आहे. हा डुअल सीम फोन आहे आणि 3 जी सपोर्ट करतो. हा 25 डिसेंबरपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. 
 
आइरिस फ्यूल 60 ची वैशिष्टय़े स्क्रीन- 5 इंच हाय डेफिनेशन प्रोसेसर- 1.3 जीएचझेड क्वॉड कोर प्रोसेसर ओएस- एंड्रॉइड किटकॅट कॅमेरा- 10 एमपी ऑटो फोकस रिअर, एलईडी फ्लॅश फ्रंट कॅमेरा- 2 एमपी किंमत- 8,888 रुपये.

वेबदुनिया वर वाचा