फोनची बॅटरी खराब झाल्याचे तुम्हाला वाटते. परंतु तुमच्या काही चुकामुळेही असे होऊ शकते. तुम्ही तुमच्या फोनवर Wi-Fi, GPS आणि ब्लुटूथ एकाचवेळी वापरता. या सर्व गोष्टी एकाचवेळी ऑन झाल्यामुळे फोन स्लो चार्ज होतो. अशावेळी फोनला लवकर चार्ज करण्यासाठी सगळ्या सेटिंग आणि सर्व्हिसेस बंद करा.
स्मार्टफोनवर खूप सारे अँप्स असतात, जसे की, मेल, फेसबुक, टिटर यामुळे बॅटरी कमी होते. या सगळ्या अँप्सला चार्ज करताना बंद करा. फोनला युनिवर्सल चार्जर आणि लोकल अँडॉप्टरने चार्ज केल्याने स्लो चार्जिग होते.
यामुळे फास्ट चार्जिगसाठी अँडॉप्टरचा वापर करा. जो की, तुमच्या फोनबरोबर आलेला आहे. कधी-कधी फोनमध्ये चुकीच्या बॅटरी येतात. अशावेळी बॅटरीची खात्री करुन ती बदलून घ्या. काहीवेळी बॅटरी जुनी असल्यामुळेही फोन स्लो चार्ज होतो. चार्जिग करताना स्मार्टफोनचा वापर केल्यासही स्लो चार्ज होतो. यामुळे फोनचा यावेळी वापर कमी करा.