मराठीची दिवसेंदिवस होत असलेली दुरवस्था ही केवळ मराठीची ओळख पूर्णपणे न झाल्याने होत आहे, हे त्याच्या लक्षात आले. ही ओळख सुलभपणे करून देण्यासाठी त्याला खेळाचे रूप देणे आवश्यक होते. यातून मराठी शब्दशोध या अँपचा जन्म झाल्याचे मानसने सांगितले. झाबुझा लॅब्सने हा खेळ तयार करायला या वर्षी मार्चमध्ये सुरुवात केली.
काही जणांनी शोध घेतल्या जाणार्या शब्दांचे शुद्धलेखन पाहण्याचा, तर काहींनी विभागवार किंवा गटवार शब्दांचे संच शोधण्याची कोडी तयार करण्याचा सल्ला मानस आणि त्याच्या टीमला दिला. यातून हा खेळ अधिकाधिक सुधारत गेला. आज या खेळात 300 लेव्हल्स देण्यात आल्या आहेत.