ब्लॅकबेरीचा पाकिस्तानला अलविदा!

बुधवार, 2 डिसेंबर 2015 (11:02 IST)
ब्लॅकबेरी या मोबाइल कंपनीने पाकिस्तान सरकारशी वादानंतर अखेर पाकिस्तानातील मोबाइल बाजाराला अलविदा केलं आहे. पाकिस्तान सरकार ब्लॅकबेरी यूजर्सच्या खासगी माहितीवरही नियंत्रण मिळवू पाहतं होतं. त्यामुळे पाकिस्तानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, असे ब्लॅकबेरीकडून सांगण्यात आलं आहे. ब्लॅकबेरीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मार्टी बिअर्ड यांनी एका ब्लॉग पोस्टमधून सांगितले की, पाकिस्तानला ब्लॅकबेरी यूजर्सच्या माहितीवर नियंत्रण हवं होतं. पण यामुळे आमच्या यूजर्सच्या खासगी माहितीची सुरक्षितता धोक्यात येते. त्यामुळे पाकिस्तान सरकारशी आम्ही सहमत नाही.

ब्लॅकबेरी इंटरप्रायजेस सर्व्हिस ट्रॅफिकवर नजर ठेवण्यासाठी पाकिस्तान सरकार सक्षम होऊ पाहत आहे. यामध्ये बीईएस ई-मेल आणि बीबीएम मॅसेजचा समावेश आहे. मात्र, ब्लॅकबेरी अशा आदेशाचं पालन कदापी करणार नाही. शिवाय, आम्ही पाकिस्तान सरकारला अनेकदा सांगितलं होतं की, यूजर्सच्या खासगी माहितीचं कधीच अँक्सेस देऊ शकत नाही, असेही मार्टी बिअर्ड म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा