अँग्री बर्ड खेळा आणि कार्यक्षमता वाढवा

शनिवार, 12 जुलै 2014 (15:13 IST)
दैनंदिन आयुष्यात आनंदी राहायचे आणि रोजच्या कामाचा व्याप कार्यक्षमपणे सांभाळायचा या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ नक्की कशाप्रकारे साधायचा, असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडत असेल. मात्र, नुकत्याच झालेल्या एका शास्त्रीय पाहणीत एक आश्चर्यकारक निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. कामावर असताना काही मिनिटांचा ब्रेक घेऊन अँग्री बर्डसारखे मोबाइल गेम्स खेळल्याने कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होऊ शकते, असे या पाहणीत दिसून आले. 
 
कर्मचार्‍यांच्या मोबाइल फोनवर गेम खेळण्याच्या सवयीमुळे कंपनीचा तोटा होण्याऐवजी उलट फायदाच होतो असा निष्कर्ष अमेरिकेतील कान्सस विद्यापीठातील संशोधकांनी नुकताच जाहीर केला. यासाठी पूर्णवेळ काम करणार्‍या वेगवेगळ्या क्षेत्रातील 72 कर्मचार्‍यांचे निरीक्षण करण्यात आले होते. आपल्या आठ तासांच्या कामावरील वेळेदरम्यान, साधारण 22 मिनिटांचा कालावधी या कङ्र्कचार्‍यांनी स्मार्टफोनवरील गेम्स खेळण्यासाठी वापरला. ङ्कात्र, यामुळे कर्मचार्‍यांच्या आनंदी राहण्यात आणि कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे दिसून आले.

वेबदुनिया वर वाचा