Navratrostva Special Upvasacha Dosa Recipe :उपवासाचा डोसा रेसिपी

गुरूवार, 15 सप्टेंबर 2022 (09:08 IST)
काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन टिपले आहे. नवरात्रीमध्ये भाविक नऊ दिवस उपवास करतील आणि उपवासात फराळाचं खातील. दररोज फराळाचे तेच सेवन करणे कंटाळवाणी असते. या नवरात्रीमध्ये उपवासाचा डोसा करून बघा हे नक्कीच तुम्हाला आवडेल. चला तर मग साहित्य आणि कृती लिहून घ्या.
 
साहित्य -
वरईचे तांदूळ किंवा भगर - 1 कप
साजूक तूप - 4 चमचे
खोबरे किसलेले - 1 कप 
सेंधव मीठ 
 
कृती -
वरईचे तांदूळ ज्याला भगर देखील म्हणतात.3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. नंतर 2 तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्यातील पाणी काढून मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट करून घ्या.  
ही पेस्ट एका खोलगट भांड्यात काढून त्यात दीड कप पाणी घालून ढवळून घ्या. त्यात मीठ मिसळा. हे मिश्रण पातळ ठेवायचे आहे. जेणे करून डोसा पसरेल. 
आता नॉनस्टिक तव्यावर थोडे साजूक तूप पसरवून घ्या त्यावर चमच्याने पातळ थर पसरवून घ्या. पातळ तूप त्या डोसाच्या भोवती सोडा नंतर 2 ते 3 मिनिटानंतर त्याला उलटून द्या. हलके गुलाबी होई पर्यंत मंद आचेवर पडू द्या. नंतर डोसा कुरकुरीत झाल्यावर गुंडाळून प्लेटमध्ये काढा आणि नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करा.  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती