नवरात्रीसाठी भक्त आधीच तयारी करतात. नवरात्रीमध्ये जे कोणी दुर्गेची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी येते. तरी अशी काही कामे आहेत जी नवरात्रीत करू नये नाहीतर देवी नाराज होऊ शकते.
मांस- अल्कोहोल याचे सेवन टाळा
नवरात्रीचे नऊ दिवस मांसाहार व मद्यपान टाळावे. नऊ दिवस संपूर्ण सात्विक आहार घ्यावा.
धार्मिक गोष्टींमध्ये व्यस्त रहा
नवरात्रीच्या पवित्र दिवसात फालतू बोलण्यापेक्षा धार्मिक गोष्टींवर भर द्यावा, याची विशेष काळजी घ्यावी लागेल.