केली घटस्थापना सर्वांनी श्रद्धेने,
माळ लावली नवरात्राची भक्तिभावाने,
तेवतो आहे दिवा अहोरात्र, नऊ रात्री साठी,
अंधःकार मिटविण्यासाठी उजळल्या वाती,
दावून रोज नैवेद्य देवीला, गाऊ मंगल गाणी,
शौर्याच्या तिच्या ऐकू रोज नवी कहाणी,
कन्येस घालू जेवण, धुवून पाय तयांचे,
सुवासिनींना देऊ वाण, घेऊ आशिष त्यांचे,
श्रद्धापूर्वक करा सयानो नवरात्री चा उत्सव,
जपून ठेवा मनामनात तुम्ही भक्तिभाव,
पुढच्या पिढीसही द्यावे उत्तम संस्कार,
सुरू राहील हाच प्रवास श्रद्धेचा निरंतर!