स्तुती सुमने आई मी,उधळली ,
वाहिली श्रद्धे ची ग श्रद्धांजली,
आळविले तुजला प्रेमभरे सर्वदा,
भाकली करुणा तुझी ग सदा!
पुजली नित्य मी तुझी पाऊले ,
गीत तुझ्या साठीच ग गायिले,
आरती ओवाळून धन्य धन्य जाहले,
अखंड ज्योत लावून नवरात्र मांडले,
खणा नारळा ने ओटी तुझी भरून,
सौभाग्याचे लेणं तुजला देऊन,
पदरी आनंद घेऊन, सहर्षे मी नाचली,