नवरात्र 2020 : 12 राशींवर पडणाऱ्या प्रभावाबद्दल जाणून घ्या

शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (12:35 IST)
नवरात्र म्हटले तर सर्वांच्या डोळ्या समोर येत ते उत्साहाचे आणि आनंदाचे पावित्र्य असे वातावरण आणि गरब्याची रैलपैल. लोकं अती उत्साहाने आणि आनंदाने हा उत्सव साजरा करतात. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये उत्साह असतो. सगळी कडे नऊ दिवस पावित्र्यताचे वातावरण असतं. नवरात्राचे 9 दिवस घरात सौख्य, भरभराटी आणि आनंद घेऊन येतात. यंदाचे हे नवरात्र आपल्या या 12 राशींसाठी काय घेऊन आले आहे आणि कोणते आशीर्वाद आपल्या पदरी पडणार आहे जाणून घ्या...
 
मेष - आर्थिक लाभ, सर्व इच्छा पूर्ण होण्याचा आशीर्वाद देतं आहे.
वृष - वृष राशींच्या लोकांसाठी यंदाचे नवरात्र मुलांची काळजी होणयासह आरोग्यास फायदा मिळविण्याचा आशीर्वाद देतं आहे.
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी यंदाचे नवरात्र सौख्य आणि धनप्राप्तीचा आशीर्वाद देतं आहे.
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी यंदाचे नवरात्र शत्रू पीडा होण्यासह अर्थलाभ आणि रोगाचा नायनाट होण्याचा आशीर्वाद देतं आहे.
सिंह - सिंह राशीच्या लोकांना यंदाच्या नवरात्रीत तोटा व मानसिक काळजी सहन करावी लागू शकते तरी आरोग्यास लाभ होण्याचा आशीर्वाद मिळेल.
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी यंदाचे नवरात्र आनंद, सन्मान आणि संपत्ती मिळण्याचा आशीर्वाद देतं आहे.
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी उगाचची काळजी, त्रास होणं भाग्यात असलं तरी पदलाभ होणं आणि रोगाचा नायनाट होण्याचा आशीर्वाद मिळणार आहे.
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मानसिक चिंतेेची वेळ असली तरी आनंदाची प्राप्ती आणि चांगल्या आरोग्याचे आशीर्वाद देतं आहे.
धनू - धनू राशीच्या लोकांसाठी यंदाचे नवरात्र आनंद आणि एकाएकी धनलाभ आणि विवाह योग असण्याचा आशीर्वाद देतं आहे.
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी यंदाचे नवरात्र अर्थलाभ, आनंद आणि शत्रूंचा नाश होण्याचा आशीर्वाद देतं आहे.
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांना यंदाचे नवरात्र यश, प्रगती आणि आनंदाचा आशीर्वाद देतं आहे.
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी यंदाचे नवरात्र शत्रूचा नायनाट होणं, धनलाभ आणि बढती होण्याचा आशीर्वाद देतं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती