नवरात्री चौथा दिवस : स्मित हास्यामुळे ब्रह्मांड रचणारी देवी कुष्मांडा

कुष्मांडा
दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव ' कुष्मांडा' आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते, चारी बाजूला अंधार पसरलेला होतो तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.
 
 
कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. कुष्मांडाची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती