बबिता देवी असे या महिलेचे नाव असून, पोपट बेपत्ता झाल्यापासून त्यांनी 3 जानेवारीपासून अन्नत्याग केला आहे, अशी माहिती तिच्याा कुटुंबीयांनी दिली.
गेल्या आठ वर्षांपासून हा पोपट संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना सकाळी उठीत होता. त्याचप्रमाणे तो कुटुंबातील सदस्य असल्यासारखाच होता, त्यामुळे तो केळव पिंजर्यापुरता मर्यादित नव्हता, असे या महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले, बेपत्ता पोपट परत मिळविण्यासाठी संबंधित महिला आपल्या जिवावर उदार झाली असून पोपट शोधून देण्यासाठी तिने मदतीचे आवाहन करणारी पत्रके वितरित केली आहेत.