पश्चिम बंगाल : गळ्यात घुसले 150 वर्ष जुने त्रिशूल, काढण्यासाठी 65 किमी चा प्रवास केला

मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (13:33 IST)
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एका व्यक्तीच्या गळ्यात 150 वर्ष जुना त्रिशूळ घुसले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जखमी भास्कर राम यांनी शस्त्रक्रियेसाठी सुमारे 65 किमीचा प्रवास केला.राम यांना उपचारासाठी कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी येथील रहिवासी भास्कर राम यांनी शस्त्रक्रियेसाठी सुमारे 65.किमीचा प्रवास केला.
 
रविवारी रात्री परस्पर वादातून एका व्यक्तीने भास्कर राम यांच्या गळ्यात त्रिशूल खुपसला. हे पाहून पीडितेची बहीण बेशुद्ध झाली. पण भास्कर राम यांनी किमान 65 किलोमीटरचा प्रवास करून कल्याणीहून कोलकाता येथील एनआरएस मेडिकल कॉलेज गाठले. डॉक्टरांनी त्याला पाहिल्यावर त्यांनाही धक्का बसला. कारण ते त्रिशूल भास्करच्या गळ्यात घुसलेले होते
 
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री तीन वाजता रुग्ण एनआरएस रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात आला .यावेळी त्यांच्या गळ्यात त्रिशूल घुसलेले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्रिशूल सुमारे 30 सेमी लांब आणि अनेक वर्षे जुने असल्याचे आढळले. त्रिशूल रुग्णाच्या शरीरात अडकला होता. मात्र आश्‍चर्यकारक बाब म्हणजे रुग्णाला कोणतीही वेदना जाणवत नव्हती.

रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तातडीने एक विशेष टीम तयार केली.रूग्णाच्या गळ्यातील त्रिशूल काढण्यासाठी रूग्णालय प्रशासनाने तातडीने विशेष ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू झाली. ऑपरेशन करणे अत्यंत जोखमीचे होते. पण डॉक्टरांच्या टीमने ते यशस्वीपणे पार पाडले आहे. रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे.

Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती