गोव्यात नेतृत्व बदल नाही, विनय तेंडुलकर यांचे स्पष्टीकरण

सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (08:39 IST)
मनोहर पर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याचं गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे गोव्यातल्या नेतृत्व बदलाच्या चर्चेला पूर्णविराम दिलाय. सोबतच इतर मंत्रीही स्वत:च्या खात्याचा कारभार पाहण्यास सक्षम असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
 
सध्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना एम्समध्ये दाखल केल्यामुळे गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला होता. तसंच नेतृत्व बदलाचीही चर्चा रंगली होती. गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते रामलाल, संघटन मंत्री विजय पुराणिक, गोव्यात आले आहेत. त्यांच्यासोबतच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकरांनी नेतृत्व बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे निरीक्षकांनी भाजपच्या आमदारांची मतं जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संवाद सुरू केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती