नवी दिल्ली- दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल पाकिस्तान माफी मागेल आणि सर्व दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करेल, असा आशावाद केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. सर्व जगाने एकत्र येऊन दहशतवादाविरूद्ध लढावे. तो
मानवजातीचा शत्रू आहे. पाकिस्तानला त्याची जाणीव झाली असेल, अशी आशा आहे. तसेच दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल पाकिस्तान माफी मागेल आणि सर्व दहशतवादी तळे उद्ध्वस्त करून 26/11 च्या हल्ल्याच्या सूत्रधारांना भारताच्या ताब्यात देईल, असा आशावाद नायडू यांनी व्यक्त केला आहे. तसेच आम्हाला आमच्या शेजारी देशांसोबत कायम मैत्रिपूर्ण संबंध निर्माण करायचे आहेत. मात्र पाकिस्तानला त्यांच्या धोरणात बदल करणे आवश्यक आहे, असेही ते पुढे म्हणाले. पाकने अनेकदा शस्त्रसंधीचा भंग केला; तर सीमा परिसरातील लष्कराच्या तळांवर दहशतवादी हल्लेही सुरूच आहेत.