सरकारचा मोठा निर्णय : वैष्णो देवी यात्रा १६ ऑगस्टपासून सुरू
बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (11:02 IST)
दरवर्षी मोठ्या संख्येने जम्मू येथील माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येत असतात. पण या कोरोना काळात सर्व धार्मिक स्थळं बंद असल्यामुळे यंदाच्या वर्षी वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जाता येणार नाही अशी खंत भक्तांच्या मनात होती. पण १६ ऑगस्टपासून माता वैष्णो देवीची यात्रा सुरू होणार आहे. सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय यासोबतच सरकार कडून काही दिशा-निर्देश देखील जारी करण्यात आले आहेत. जर तुम्ही या यात्रेसाठी जात असाल तर सारकारकडून घालून देण्यात आलेले नियम तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे.
कोरोना काळात भक्तांनी हे नियम पाळणे गरजेचे आहे.
- १६ ऑगस्टपासून माता वैष्णो देवी यात्रा सुरू होणार आहे.
- मर्यादित संख्येने भक्तांना देवीच्या दर्शनासाठी परवानगी मिळेल.
- यात्रे दरम्यान मास्क घालणे आवश्यक असेल. मास्क शिवाय तुम्हाला यात्रा करता येणार नाही.
- सकाळी-संध्याकाळी होणाऱ्या भव्य आरर्तीमध्ये भक्तांना सहभागी होता येणार नाही.
- मंदिर परिसरात रात्रभर भाविकांच्या मुक्कामास बंदी असेल.
- रात्रीच्या वेळी यात्रा बंद असेल.
- १० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना यात्रेसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.
- ३० सप्टेंबर पर्यंत एका दिवसात जास्तीत जास्त पाच हजार भक्त देवीचं दर्शन घेवू शकतील.
- आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करणे बंधनकारक असेल.
- मूर्ती आणि पवित्र पुस्तकांना स्पर्श करण्यास परवानगी नाही.