अमेरिकेच्या १३ व्यवसायिक लघु उपग्रहांचं श्रीहरीकोटातून प्रक्षेपण

बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (09:40 IST)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था २५ नोव्हेंबरला कार्टोसॅट-३ आणि अमेरिकेच्या १३ व्यवसायिक लघु उपग्रहांचं श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरुन प्रक्षेपण करणार आहे. सकाळी नऊ वाजून २८ मिनिटांनी हे प्रक्षेपण होणार असून या सर्व उपग्रहांना सुर्याच्या समोर कायम राहणा-या कक्षेत सोडलं जाणार आहे.
 
पीएसएलव्ही-सी ४७ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं हे प्रक्षेपण होणार आहे. कार्टोसॅट-३ हा उपग्रह अत्युच्च दर्जाची छायाचित्र घेण्याची क्षमता असलेला तिस-या पिढीतला आधुनिक उपग्रह आहे. ५०९ किलोमीटर अंतरावर असलेल्या कक्षेत तो सोडला जाणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती