लेफ्टनंट उमर यांचे विवाहसोहळ्यातून अपहरण करून हत्या

बुधवार, 10 मे 2017 (17:07 IST)

भारताच्या 22 वर्षीय लेफ्टनंट उमर फयाझ  यांची दहशतवाद्यांनी विवाहसोहळ्यातून अपहरण  करून गोळ्या घालून हत्या केली आहे. उमर फयाझ हे 5 महिन्यापूर्वीच आर्मीत भरती झाले होते. लष्कराच्या ‘राजस्थान रायफल्स’ तुकडीत ते होते. उमर फयाझ यांचा मृतदेह शोपीयन परिसरात आढळला. त्यांच्या डोक्यात आणि पोटात गोळ्या आढळल्या आहेत. उमर फयाझ हे मूळचे काश्मीरचेच होते. त्यांनी चुलत भावाच्या लग्नासाठी सुट्टी घेतली होती. दक्षिण काश्मीरमधील कुलगाव इथं हा विवाहसोहळा होता. मात्र रात्री दहाच्या सुमारास दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं. त्यांचं कुटुंब दहशतीखाली होतं. भीतीमुळे त्यांनी याबाबतची तक्रारही केली नाही. उमर फयाझ हे परत येतील अशी आशा त्यांना होती. मात्र त्यांचा मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे.

वेबदुनिया वर वाचा