जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (12:26 IST)
जम्मू-  काश्मीरमधील अनंतनाग येथे लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची बातमी आहे. या कारवाईत घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणवर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक पोलीस, सीआरपीएफ आणि जवानांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. 
 
जम्मू-काश्मीरमधील बिजबेहरा येथील संगम भागात ही चकमक झाली. दहशतवाद्यांनी मध्यरात्रीनंतर या परिसरात गोळीबार सुरू केला होता. जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती