मानावाला आणि अमृतसरदरम्यान रावण दहनाच्या कार्यक्रमाप्रसंगी घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर ट्रेन चालकाने म्हटले की ट्रॅकवर गर्दी पाहताच आपत्कालीन ब्रेक दाबून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण संतप्त जमावाने दगडफेक केल्यामुळे गाडी थांबवली नाही. परंतू प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या गावकऱ्यांनी ट्रेन चालकाचा हा दावा फेटाळून लावला आहे.