पाचशेच्या नोटा चालणार नाहीत टोल वसुली सुरु

शनिवार, 3 डिसेंबर 2016 (15:50 IST)
नोटाबंदी झाल्यापासून बंद केलेली टोलवसुली आजपासून सर टोल नाक्यावर सुरुवात झाली आहे. मात्र जिथे  टोल दोनशे रुपयांच्या पुढे असेल तरच ५०० ची नोट स्वीकारण्यात येणार असल्याचे समजते. मध्यरात्रीनंतर टोलवसुली सुरु करण्यात आल्यानंतर सुट्ट्याअभावी अनेक ठिकाणी वाहनधारकांची तारांबळ उडाली. यामुळे अनेक वाहनांना वेळ लागत होता. त्यांमुळे टोल नाक्यांवर मध्यरात्रीदेखील लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत. तर राज्य शासनाने ई पेमेंट अथवा कार्ड वापरण्यास सागितले आहे.

वेबदुनिया वर वाचा