सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात काँग्रेसची माजी सदस्य आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी सरकारवर टीका केली आहे. सीएएची तुलना ब्रिटिश सरकारच्या रोलेट कायद्यासोबत केली आहे. पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
'१९१९ साली दुसरं महायुद्ध संपल्यानंतर इंग्रजांना कल्पना होती की भारतीयांच्या मनात असंतोष पसरत आहे आणि हा असंतोष एक दिवस बाहेर निघेल. म्हणून त्यांनी एक कायदा आणला होता. त्या कायद्याला रोलेट कायदा असं नाव देण्यात आला होतं. १९१९ चा रोलेट कायदा आणि २०१९चा सीएए कायदा इतिहासातील काळा कायदा म्हणून ओळखला जाईल.' असं उर्मिला म्हणाल्या.