केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगारवाढ होणार

सोमवार, 17 एप्रिल 2023 (15:27 IST)
येत्या काळात केंद्रसरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देणार असून त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. सरकार महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा विचार करत आहे. वाढीव भत्ता 46 टक्के होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ह्याचा फायदा होणार आहे. 
या पूर्वी केंद्र सरकार ने जानेवारी 2023 ते जून 2023 पर्यंतच्या पहिल्या सहामाही डीए मध्ये वाढ करण्यात आल्यामुळे डीए मध्ये वाढ होऊन 42 टक्के झाला असून आता त्यात वाढ होऊन 46 टक्के होण्याची शक्यता आहे.  याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
 
Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती