मागील दोन दिवसांपासून मुंबईकरांना थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. मुंबई शहरात कमाल तापमानाचा पारा २४ अंश सेल्सियसपर्यंत खाली असल्यानं मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरलीय आहे. त्यामुळे कधी नेव्हे ते मुंबईकरांवर स्वेटर घालून बाहेर पडले आहे. महाबळेश्वरमध्ये पारा शून्य अंशावर आला असून त्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरच्या दिशेने जात असून आनंद घेत आहेत. मुंबईत सरासरीपेक्षा कमाल तापमानात जवळपास सहा अंश सेल्सिअसनं घट झाली आहे. कधी नेव्हे ते मुंबईला थंडी अनुभवता येते आहे. मागील दहा वर्षांत फेब्रुवारी महिन्यात प्रथमच तापमानाचा पारा इतका खाली गेलाय. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे तापमानात घट झाल्याचे हवामान खात्यानं स्पष्ट केले आहे. तर पुढील दोन दिवस कमाल तापमानासह किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईला अजून थंडी जाणवणार आहे. तर महाबळेश्वरचा पारा शून्य अंशांवर आला असून, वेण्णालेक व लिंगमळा परिसरात स्ट्रॉबेरी पिकावर बर्फ जमा झाल्याचे पहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी पाण्याचाही बर्फ झालेला दिसतोय. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये काश्मीरचे वातावरण तयार झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे अजून दोन दिवस तरी राज्यात थंडी पहायला मिळणार आहे.