अंदमानचा समुद्र, अंदमान-निकोबार बेट, बंगालचा उपसागराचा भाग आणि मालदीवच्या कोमोरीनपर्यंत मान्सून पोहोचला आहे. पुढच्या ४८ तासात मालदीवचे आणखी काही भाग नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
वादळाची शक्यता असल्यामुळे केरळमध्ये मच्छीमारांना रात्रीपर्यंत किनाऱ्यावर पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांना शक्य नाहीय, त्यांना जवळचा किनारा गाठण्यास सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने याआधी सहा जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असे म्हटले होते.