देशात मन्कीपॉक्स संसर्ग चाचणी किट येणार, निकाल एक तासात येईल

शनिवार, 28 मे 2022 (10:49 IST)
जगभरात वेगाने पसरणाऱ्या मन्कीपॉक्सच्या आजाराबाबत भारत सरकार सजग आहे. दरम्यान वैद्यकीय उपकरण निर्माता त्रिविट्रॉन हेल्थ केअरने शुक्रवारी जाहीर केले की त्यांनी भारतात मंकीपॉक्स विषाणूचा जलद शोध घेण्यासाठी 'रिअल-टाइम PCR (RTPCR) किट' तयार केले आहे. तथापि, किट सध्या फक्त संशोधन-वापरासाठी (RUO) उपलब्ध आहे. मन्कीपॉक्स चाचणीचा अहवाल अवघ्या 1 तासात येईल.या मुळे समजेल की रुग्णाला ऑर्थोपॉक्स विषाणू म्हणजे मन्कीपॉक्सची लक्षणे आहेत की नाही.  हे किट चार रंगात बनवले आहे. प्रत्येक रंगात विशिष्ट प्रकारची चव वापरण्यात आली आहे. ही चाचणी एकाच ट्यूबमध्ये स्वेब चाचणीद्वारे केली जाईल 
 
मंकीपॉक्स विषाणूचा उगम प्रथम पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील देशांमध्ये झाला होता परंतु आता तो जागतिक स्तरावर वेगाने पसरत आहे. ब्रिटन, जर्मनी, इटली सह सध्या  29 हून अधिक देशांमध्ये सुमारे 200 पुष्टी झालेली प्रकरणे आणि 100 हून अधिक संशयित प्रकरणे आहेत. अद्याप तरी सुदैवाने भारतात मन्कीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. या आजाराची लक्षणे आढळल्यास सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. तसेच या आजाराची लक्षणे सांगून सर्व राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. 
 
त्रिविट्रॉन हेल्थकेअर ग्रुपचे सीईओ चंद्रा गंजू यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “भारत नेहमीच जगाला मदत करण्यात आघाडीवर आहे, विशेषत: कोविड-19 महामारीच्या काळात, आणि यावेळीही जगाला मदतीची गरज आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, मंकीपॉक्स हा ऑर्थोपॉक्स विषाणूंमुळे होतो, ज्यामध्ये स्मॉलपॉक्सचा व्हॅरिसेला विषाणू, स्मॉलपॉक्सच्या लसीमध्ये वापरला जाणारा लस विषाणू आणि काउपॉक्स विषाणू यांचा समावेश होतो. पीसीआर किट हे चार रंगांचे संकरित किट आहे, जे एका तासाच्या आत स्मॉल पॉक्स आणि मंकी पॉक्समध्ये फरक करू शकते.
 
या चार-जीन RT-PCR किटचा पहिला जनुक त्याचा विषाणू एका व्यापक ऑर्थोपॉक्स गटातून शोधतो, दुसरा आणि तिसरा अनुक्रमे मंकीपॉक्स आणि स्मॉलपॉक्स विषाणू शोधतो आणि वेगळे करतो, असे कंपनीने म्हटले आहे. तर चौथा जनुक मानवी पेशी-संबंधित अंतर्गत प्रसार ओळखतो आणि साथीच्या संसर्गाच्या वेळी ते शोधून काढून टाकण्याचे काम करतो.त्रिविट्रॉनच्या भारत, यूएसए, फिनलंड, तुर्की आणि चीनमध्ये 15 उत्पादन कंपन्या आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती