भाजपची विचारधारा मान्य नसणारे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नागरी संघटना यांनी देशाची अखंडता अबाधित राहावी, यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या नेत्यांनी केले. कन्याकुमारीमधून पदयात्रेला सुरुवात करून त्याचा काश्मीरमध्ये समारोप करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात राहुल गांधी यांचा १६ दिवस मुक्काम असणार आहे. या दरम्यान ३८३ कि. मी. पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष जितू पटवारी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली