या 5 रूपयांच्या थाळीत भात, चपाती, डाळ, एक भाजी आणि पापड असेल. अनेकांना ऐकवेळचे जेवणही मिळत नाही, अशांसाठी हा दिलासादायक निर्णय असेल, असे मत उत्तर प्रदेशाचे दुग्धविकास व सांस्कृतिक मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी मांडले.
याबाबत अधिक माहिती देताना चौधरी म्हणाले, मी नुकताच छत्तीसगड येथे दौर्यावर गेला होता. त्यावेळी मी तेथील सरकारकडून देण्यात येत असलेल्या 5 रूपयांत मिळणार्या थाळीचा आस्वाद घेतला. मी तेथे असताना अनेकवेळा 5 रूपयांत जेवण केले. ते अन्न खूप स्वच्छ, चांगले आणि चवदार होते. मी तेथील स्वच्छतेवरही खूप समाधानी आहे, असे कौतुकही त्यांनी केले.