सलमान खान वर हल्ला करणाऱ्या कट मध्ये सहभागी पाचव्या आरोपीला अटक

सोमवार, 3 जून 2024 (10:10 IST)
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरी गोळीबार झाल्यानंतर लागलीच पनवेल मधील सलमान खानच्या फार्महाऊसवर हल्ला करण्याचा कट लॉरेंस बिश्नोई गँगने रचला होता. या प्रकरणामध्ये नवी मुंबई पोलिसांनी चार लोकांना ताब्यात घेतले होते. तर आता याच प्रकरणात पोलिसांनी राजस्थान मधून भिवानी जिल्ह्यामधून पाचव्या आरोपीला अटक केली आहे. 
 
राजस्थानच्या भिवानी जिल्ह्यामधून 30 वर्षीय आरोपी दीपक गोगलीया उर्फ जॉनी वाल्मिक याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये पोलीस आता हा शोध घेत आहे की, यांना लोकल सपोर्ट कोणी केला होता. तसेच कोण कोण यामध्ये सहभागी आहे. 
 
सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर काही महिन्यांमध्ये पनवेल मध्ये असलेले सलमान खानचे फार्म हाऊस वर सलमान खान याच्यावर हल्ला करण्याचा कट लॉरेंस बिश्नोई गँगने रचला होता. यामध्ये नवी मुंबई पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार सर्व आरोपी फार्म हाऊसवर आणि शूटिंग स्थळावर नजर ठेऊन होते. तसेच या आरोपींना सलमान खानवर AK-47  सहित इतर हत्यारांनी गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला होता. एवढेच नाही तर पोलिसांना चौकशीमध्ये ही माहिती मिळाली की, सलमान खानवर जो हल्ला करण्याचा प्लॅन होता. त्यासाठी हत्यार पाकिस्तानमधून मागितले जाणार होते. 

Edited By- Dhanashri Naik   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती