अवनी वाघीनीच्या बछड्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडणार

टी -1 अवनी वाघीनीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन  बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम वन विभागाने हाती घेतली आहे. येत्या काही दिवसात या दोन्ही बछडयाना ट्रँन्क्युलाईज करून त्यांना सुरक्षित पकडण्यासाठी वनविभागाचे  प्रयत्न सुरू आहेत. तसेच या दोन बछड्याना ट्रँन्क्युलाईज करून पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली  आहे. रम्यान, वडिलांच्या सावलीत राहिलेल्या या दोन बछड्यांनी आता वडिलांकडून शिकारीचे प्रशिक्षण घेतले असून, आता बछडेही शिकार करू लागले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती