स्वराज यांनी सोडवली महिलेची व्हिसा तक्रार

शुक्रवार, 31 मार्च 2017 (11:39 IST)
ज्योती पांडे या महिलेने  सुषमा स्वराज यांना ट्विट करत  व्हिसा मिळत नसल्याचं सांगितलं. 'कृपया माझा व्हिसा मिळवून देण्यासाठी मला मदत करा. माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी मला आत्महत्या करावी लागेल का ?' असं केलं होतं.स्वराज यांनी नेहमीप्रमाणे तातडीने या ट्विटची दखल घेऊन उत्तर देत 'तुम्ही हार मानू नका, तुमची समस्या सांगा', अशी विनंती केली. यानंतर सुषमा स्वराज यांनी ज्योती पांडे यांच्यामध्ये खूप वेळ चर्चा सुरु होती. 'मला न्यूझीलंडचा व्हिसा हवा आहे. माझे पती न्यूझीलंडचे रहिवासी असून मी एका समस्येत अडकले आहे. आतापर्यंत तीन वेळा मला व्हिसा नाकारण्यात आला आहे', अशी माहिती त्या महिलेने दिली. यावर सुषमा स्वराज यांनी आपला ईमेल आयडी देत व्हिसाची प्रत पाठवण्यास सांगितलं. केंद्रीय मंत्री असूनही सुषमा स्वराज यांनी आपली समस्या ऐकण्यासाठी इतका वेळ दिला याबद्दल त्या महिलेने आभार मानले. 'देव तुम्हाला सर्व सुख देवो. माझं म्हणणं ऐकून घेतलंत आणि उत्तरही दिलंत', असं म्हणत तिने आभारप्रदर्शन केलं.  

वेबदुनिया वर वाचा