बापरे दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या

शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016 (10:37 IST)
सुरतचे हिरे व्यापारी सावजीभाई ढोलकिया यांनी यंदा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या दिल्या. सावजीभाई ढोलकिया यांची हरे कृष्णा एक्सपोर्टर्स या कंपनीमध्ये सध्या साडेपाच हजार कर्मचारी काम करतात. तर कंपनीची वार्षिक उलाढाल सहा हजार कोटीएवढी आहे. यातल्या ज्या कर्मचाऱ्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली अशा 1665 कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जाणार आहे. या कर्मचाऱ्यांपैकी 1200 कर्मचाऱ्यांचा पगार दहा हजार ते साठ हजारांच्यामध्ये आहे.

वेबदुनिया वर वाचा