जात, धर्म, भाषेच्या नावावर मत मागणे बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट

सोमवार, 2 जानेवारी 2017 (16:58 IST)
यापुढे निवडणुकांमध्ये जात, धर्म, भाषेच्या नावावर मत मागणे  बेकायदेशीर असल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिला आहे. हिंदुत्व प्रकरणी करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. निवडणुकीत धर्माचा वापर करणं बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायलयाने सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला. 4 -3 च्या बहुमताने हा निर्णय देण्यात आला. निवडणूक प्रक्रिया ही धर्मनिरपेक्ष असल्याने, निवडणुकीमध्ये धर्म, जात, समुदाय आणि भाषेच्या आधारे मते मागणे घटनेच्या विरोधी असल्याचं निकालपत्रात सांगण्यात आलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा