काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दावा केला की, बुधवारी पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात 'भारत जोडो न्याय यात्रे'चा एक भाग म्हणून राहुल गांधी प्रवास करत असलेल्या कारवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. या घटनेत वाहनाच्या मागील खिडकीच्या काचा फुटल्या मात्र गांधी यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
या घटनेची माहिती देताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, "मागून कोणीतरी दगडफेक केली असावी. पोलिस दुर्लक्ष करत आहेत. निष्काळजीपणामुळे ही घटना घडली, अशी कोणतीही मोठी घटना घडू शकते."
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी पुन्हा बंगालमध्ये दाखल होणार आहे. या कालावधीत यात्रा मालदा आणि मुर्शिदाबाद मार्गे जाईल. मात्र, त्याआधी ममता सरकार यात्रेसाठी सहकार्य करत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ममता सरकारने राहुल गांधींच्या मालदा आणि मुर्शिदाबादच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचा दावा बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.