श्रीलंकन महिलेने शबरीमला मंदिरात प्रवेश करुन भगवान अयप्पांचे दर्शन

शनिवार, 5 जानेवारी 2019 (09:36 IST)
शेकडो वर्षाची परंपरा खंडीत करत बुदोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रदेश केला होता. दोन महिलांच्या प्रवेशानंतर ४६ वर्षीय श्रीलंकन महिलेने शबरीमला मंदिरात प्रवेश केला आणि  भगवान अयप्पांचे दर्शन घेतले आहे. या महिलेचे नाव शशीकला असे आहे.  केरळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.  या महिलेने रितसर कागदपत्रांची पुर्तता करुन  दर्शने घेतले आहे. त्‍यानंतर रात्री ११ वाजता ती महिला मंदिर परिसरातून सुखरुप परतल्‍याची माहिती पोलिसांनी दिली. 
 
शशीकला यांनी गाभाऱ्यात प्रवेश करुन भगवान अयप्पा स्‍वामी यांच्या समोरील 'त्‍या' पवित्र १८ पायऱ्या चढून कोणत्‍याही अडथळ्याविना दर्शन घेतले. शशीकला यांनी शबरीमाला मंदिर प्रवेशासाठीॲडव्हान्स  बुकिंग केले होते. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शशीकला आणि तिच्या नातेवाईकांनी मंदिरात प्रवेश करण्याबाबत माहिती पोलिसांना दिली होती . शशीकला यांनी आपल्‍या वया सबंधित  कागदपत्रे पोलिसांकडे जमा केली आहेत. तर शशीकला यांच्या पासपोर्टवरील माहितीवरुन त्यांचा जन्म १९७२ मध्ये झाल्‍याचे पोलिसांनी सांगितले आहे. शशीकला आणि त्यांच्या कुटुंबीयांना साध्या वेशातील पोलिस संरक्षण देण्यात आले असे पोलिसांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती