नासाच्या अंतराळविराने अंतरीक्षहून केले मतदान

मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 (12:19 IST)
मियामी- पूर्ण दुनियेत चर्चित अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकासाठी या पृथ्वीहून कितीतरी मैल दूरहून मतदान करण्यात आले आहे. नासाप्रमाणे बाह्य अंतरीक्षात असलेल्या त्याच्या एकमेव अंतराळविराने आपले मत नोंदवले आहे.
 
शेन किम्ब्रो पृथ्वीहून वरती, आंतरराष्ट्रीय अंतरीक्ष स्टेशनहून मतदान करण्याच्या परंपरेत सामील होणारे अंतराळवीर आहे. शेन 19 ऑक्टोबर रोजी रशियन सोयूज रॉकेटमध्ये सवार होऊन चार महिन्याच्या अभियानावर गेले आहे.


1997 सालीपासून अमेरिकन अंतराळवीर टेक्सास कायद्यातंर्गत मतदान करत आले आहे. अधिकश्या अंतराळवीर ह्यूस्टन क्षेत्रात राहतात जिथे नासाचा मिशन कंट्रोल आणि जॉन्सन स्पेस सेंटर स्थित आहे.
 
अंतरीक्षाहून मतदान करणारे पहिले अमेरिकन डेव्हिड वोल्फ होते. त्यांनी रशियन अंतरीक्ष स्टेशन मीरहून आपले मत दिले होते.
 
चित्र सौजन्य: सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा