स्पेस डिप्लोमसी: शेजार्‍यांसाठी भारताचा उपग्रह!

भारताने आता अवकाशातही आपली मुत्सद्देगिरी दाखवण्यात यश मिळवले आहे. भारत दक्षिण आशियाई देशांना 450 कोटी रूपयांच्या एक दळणवळण उपग्रहाची भेट देणार आहे. दक्षिण अशिया उपग्रह असे नाव असलेल्या या उपग्रहाचा भारताच्या सार्क गटातील सर्व शेजारी देशांना मोफत वापर करता येणार आहे.
 
येत्या 5 मे रोजी इस्त्रो श्रीहरिकोटामधून हा उपग्रह शांतीसंदेश घेऊन जाणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपल बागले यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की शेजारधर्म पाळण्यात भारताने कधीही कोणती कसर बाकी ठेवलेली नाही. आता हा शेजारधर्म आपण अवकाशातही पाळत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या योजनेचा उल्लेख केला. त्यांनी याला दक्षिण आशियात सबका साथ सबका विकास असे संबोधले आहे.

वेबदुनिया वर वाचा