वेबदुनियाची स्मृति आदित्य यांना तिसर्‍यांदा 'लाडली मीडिया अवॉर्ड'

नवी दिल्लीच्या चिन्मय मिशन सभागारात 8व्या 'लाडली मीडिया अवॉर्ड्स फॉर जेंडर सेंसिटिविटी 2015-16 (उत्तरी क्षेत्र)चे आयोजन करण्यात आले. स्वयंसेवी संस्था पॉपुलेशन फर्स्टकडून आयोजित समारोहात यूएनएफपीएचे राष्ट्रीय प्रतिनिधी डिएगो पॅलासियोज यांनी मीडिया जगतातील बर्‍याच ख्यातनाम महिला आणि बालिकांच्या उत्थानासाठी सकारात्मक भूमिका निभावण्यासाठी लाड़ली मीडिया अवॉर्ड्‌सने सन्मानित करण्यात आले.  
 
जगातील प्रथम हिंदी पोर्टल वेबदुनिया डॉट कॉम, इंदूरची फीचर संपादक सुश्री स्मृति जोशी (स्मृति आदित्य) यांना बेस्ट वेब फीचर 'अकेली युवती आजमाती है सुरक्षा के कैसे-कैसे उपाय'साठी सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी पापुलेशन फर्स्टचे ट्रस्टी एसवी विस्ता, निदेशक डॉ. एएल शारदा, नॅशनल लाड़ली मीडिया अवॉर्डची को-ऑर्डीनेटर डॉली ठाकोर तथा समन्वयक राखी बक्षी आणि माधवीश्री समेत मोठ्या प्रमाणात मीडियाकर्मी उपस्थित होते.    
 
अकेली युवती... आजमाती है बचाव के कैसे-कैसे उपाय...   
 
स्मृति यांना लाड़ली मीडिया अवॉर्ड तिसर्‍यांदा मिळाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा