यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

नवी दिल्ली- यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा 95 टक्के पाऊस होईल, अशी शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात 887 मिलीमीटर इतका पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले आहे.
 
यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता शून्य टक्के असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता अवघी 10 टक्के इतकी असेल. सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता 50 टक्के इतकी आहे. तर सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता 25 टक्के आहे. तर दुष्काळ पडण्याची शक्यता 15 टक्के इतकी असेलल असे स्कायमेटने म्हटले आहे.
 
जून ते सप्टेंबर या कालावधीत किती पाऊस होऊ शकतो, याचा देखील अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत 102 टक्के पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले आहे. जून महिन्यात 164 मिलीमीटर पाऊस होईल, अशी शक्यता स्कायमेटकडून वर्तवण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा