बलकौर सिंग आणि त्यांची पत्नी चरण कौर यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा, शुभदीप सिंग सिद्धू, ज्याला सिद्धू मुसा वाला म्हणून ओळखले जाते, गमावल्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनी 17 मार्च रोजी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. यानंतर त्यांनी मंगळवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, 'तुमच्या प्रार्थना आणि वाहेगुरुच्या आशीर्वादामुळे आम्हाला आमचा शुभदीप परत मिळाला, पण आज सकाळी मला खूप अस्वस्थ वाटले,
'मी सरकारला, विशेषत: सीएम भगवंत मान यांना विनंती करू इच्छितो की, उपचार होई पर्यंत आमच्यावर कृपा करा यानंतर तुम्ही मला जिथे बोलावल तिथे मी येईन, मी कुठेही पळून जाणार नाही,
एकदाचा उपचार पूर्ण होऊ द्या. मी खूप दुःखी आहे, जोपर्यंत कायद्याचा संबंध आहे, माझ्या मुलाने त्याचे 28 वर्षे आयुष्य कायद्याच्या कक्षेत व्यतीत केले आहे. मी सुद्धा फौजी आहे आणि कायद्याचा आदर करतो. मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की मी कायद्याच्या प्रत्येक पैलूंचे पालन करीन. मी कोणताही कायदा मोडला नाही आणि जर मी कायदा मोडत असेल तर मला तुरुंगात टाका आणि तरीही तुमचा विश्वास नसेल तर प्रथम एफआयआर दाखल करा आणि नंतर माझ्यावर कारवाई करा आणि मी सर्व कायदेशीर कागदपत्रे सादर करेन.