श्रद्धा वालकर हत्याकांड : श्रद्धा हत्याकांडातील आरोपींची आज नार्को टेस्ट

सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (11:46 IST)
दिल्ली पोलिसांना रविवारी (20 नोव्हेंबर) ला श्रद्धा वालकर हत्याकांडासंदर्भात दक्षिण दिल्ली भागातून कवटीचे काही तुकडे आणि हाडं मिळाली आहेत. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनी दक्षिण दिल्लीच्या मैदानगढी भागातील एक तलाव देखील रिकामा केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कोणताही मोठा पुरावा मिळाल्याचं सांगितलेलं नाही. त्यामुळे तपासकर्त्यांसाठी दिवसेंदिवस अनेक अडचणी निर्माण होत आहे.
 
ज्या फ्लॅटवर श्रद्धा आणि आफताब कथितरित्या राहत होते तिथे घेऊन गेले. तसंच दिल्ली पोलीस आणि फॉरेंसिक टीमने नारको टेस्टसंदर्भात एक महत्त्वाची बैठक घेतली.
 
नारको टेस्टमधून काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे.
 
दिल्ली पोलीसांचे माजी आयुक्त एस.एन.श्रीवास्तव यांच्या मते या केसचा उलगडा करणं बरंच कठीण जाणार आहे.
 
ते म्हणतात, “ही एक मोठी गुंतागुंतीची केस होणार आहे. त्यात आफताबचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी न्यायव्यवस्थेतील सर्व घटकांची मदत लागेल. पोलीस त्यांच्यातर्फे पूर्ण प्रयत्न करतील. मात्र कोर्टाची भूमिका सुद्धा महत्त्वाची असेल.”
 
प्रसिद्ध श्रद्धा हत्याकांडात दिल्ली पोलीस आज श्रद्धाच्या हत्येचा आरोपी आफताबची नार्को टेस्ट करू शकतात. आंबेडकर हॉस्पिटल, रोहिणी येथे आरोपीची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. 

दिल्ली पोलिसांनी रोहिणी येथील एफएसएलला नार्कोसाठी विनंती पत्र पाठवले आहे. साकेत न्यायालयाने आरोपींची पाच दिवसांत नार्को चाचणी करण्याचे आदेश दिले होते.

श्रद्धा हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिल्ली पोलीस मैदनगढ़ी, मेहरौली येथे एक तलाव रिकामा करत आहे. आरोपी आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचे डोके तलावात फेकल्याचा खुलासा केला आहे. अशा स्थितीत पोलिसांनी रविवारी तलावातून एक लाख लिटरहून अधिक पाणी बाहेर काढले, मात्र पोलिसांना श्रद्धाचे शीर सापडले नाही.

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आफताबने सांगितले की त्याने श्रद्धाचे डोके मैदानगढी येथील तलावात फेकले होते. अशा स्थितीत पालिका अधिकाऱ्यांसह पोलिसांकडून तलाव रिकामे करण्यात येत आहे. मात्र, हा तलाव मोठा असून तो रिकामा करण्यास बराच कालावधी लागणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तलाव रिकामा करण्यासाठी 15 दिवस लागू शकतात. 
 
आरोपीने श्रद्धाचे डोके व धड छत्तरपूरच्या जंगलात फेकल्याचे सांगत राहिले. दुसरीकडे दक्षिण जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी छत्तरपूर येथील आरोपीच्या भाड्याच्या घरात पोहोचले. आरोपी आफताबलाही सोबत घेतले होते. येथे पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला विचारले की त्याने कुठे आणि काय केले. दोन ते तीन तास पोलीस आरोपींसोबत येथे थांबले. येथे दृश्य पुन्हा तयार करण्यात आले.
 
श्रद्धाचे डोके आणि धड शोधण्यासाठी दिल्ली पोलीस छत्तरपूरच्या जंगलात सतत शोध मोहीम राबवत आहेत. शनिवारी आणि रविवारी रात्रभर शोधमोहीम राबविण्यात आली. पोलीस कर्मचारी सर्च लाइटच्या मदतीने श्रद्धाच्या मृतदेहाचे उरलेले तुकडे शोधत राहिले. रात्री चार वाजेपर्यंत शोधमोहीम सुरू होती. रात्रीच्या शोध मोहिमेदरम्यान सुमारे दीड किमी जंगलाचा परिसर व्यापण्यात आला. रविवारी सकाळी सहा वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. रविवारी सकाळी संपूर्ण दक्षिण जिल्ह्यातून 100 हून अधिक पोलिस शोध मोहिमेत तैनात होते. मात्र, पोलिसांना यश आलेले नाही.

Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती