अमित शहा यांच्या सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपाला आग

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रायबरेलीतील सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपाला आग लागली. आग लागली त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप प्रदेश अध्यक्ष डॉ. महेंद्र नाथ पांडे हे सभास्थानी उपस्थित होते. मंडपामधील साउंड सिस्टिममध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आगीमुळे सभास्थळी काही काळ उपस्थितांची पळापळ सुरू होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. 
 
रायबरेली मतदारसंघातील एका मोठ्या मैदानात अमित शहा यांच्या सभेचे शनिवारी आयोजन करण्यात आले. याच ठिकाणाहून शहा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नाराळ फोडण्याची शक्यता आहे. भाजपचे रायबरेली येथील प्रभारी वाजपेयी यांनी शहा हे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात एका सभेला संबोधित करतील अशी माहिती दिली होती. या  सभेसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेश भाजप अध्यक्ष महेंद्र नाथ पांडे आणि दिेनेश शर्मा व केशव प्रकाश मौर्य हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती