धक्कादायक! रिल्स बनवण्यासाठी आयफोन घेण्यासाठी 8 महिन्यांच्या मुलाला विकले

शुक्रवार, 28 जुलै 2023 (09:32 IST)
सध्या रिल्स बनवण्याचं क्रेज वाढत आहे. रिल्स बनवण्यासाठी लोक काहीही करत आहे. रिल्स बनवण्याच्या नादात जीवाचा धोका देखील पत्करत आहे. रिल्स बनवून ते सोशल मीडियावर शेअर करून जास्त लाईक्स आणि व्यूअर्स मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तत्पर आहे. रिल्स बनवण्याच्या नादात लागून पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका जोडप्याने आपल्या मुलाला आयफोन घेण्यासाठी विकले. त्याला आयफोन घ्यायचा होता जेणेकरून तो इंस्टाग्राम रील्स बनवू शकेल. रिपोर्टनुसार , हे प्रकरण पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्याशी संबंधित आहे. पोलिसांनी मुलाची आई (साथी) आणि बाळाला विकत घेणाऱ्या महिलेला (प्रियांका घोष) अटक केली आहे. मात्र, मुलाचे वडील (जयदेव) अद्याप फरार आहेत.
 
अचानक या जोडप्याच्या वागण्यात बराच बदल झालेला शेजाऱ्यांच्या लक्षात आला. तसेच, त्यांचे 8 महिन्यांचे बाळही बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशय आल्यावर त्यांनी पोलिसांना बोलावले. वास्तविक, कालपर्यंत पैशासाठी भांडत असलेल्या जोडप्याला अचानक आयफोन आल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. हे सर्व त्यांच्या मुलाच्या बेपत्ता होण्याशी जुळले. अशा परिस्थितीत तो बोलला असता, मुलाच्या आईने कबूल केले की तिने मुलाला विकले आणि पैसे पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन इन्स्टाग्राम रील्स बनवण्यासाठी वापरले.
 
धक्कादायक म्हणजे, वडिलांनी आपल्या 7 वर्षांच्या मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सध्या बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गरीब पालकांकडून पैशासाठी मुले विकणे ही काही नवीन गोष्ट नसली तरी 'आयफोन' आणि 'इन्स्टाग्राम रील' बनवण्यासाठी मूल विकणे हे समाज किती असंवेदनशील बनत चालले आहे हे त्याच उदाहरण आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती