शरद पवार यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा

मंगळवार, 29 मार्च 2022 (22:10 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘द काश्मिर फाईल्स’च्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. ‘या चित्रपटामुळे एक विचार मारला जातोय. त्यात गांधीजी, नेहरू यांचा काय संबंध? यातून देशातलं बंधुप्रेम संपवलं जात आहे’, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केलीय. पवारांनी यापूर्वीही या चित्रपटाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा पार पडला. 
 
शरद पवार म्हणाले की, दु:ख याचं आहे की पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असोत त्यांना देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरु होतं. तेव्हा एका दुपारी एकही आमदार सदनात नव्हता. ते सगळे चित्रपट पाहायला गेले होते. असंच सुरु राहिलं तर देशात एकता राहणार नाही. इतकंच नाही तर, देशातील धर्मनिरपेक्षतेवर भाजपचा विश्वास नाही. त्यात काही पाठिंबा भाजपला मिळाला आणि सत्ता त्यांच्याकडे आली. एक चित्रपट येतो, त्यात काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले आणि ते हल्ले काँग्रेस आणि अल्पसंख्यांकांनी केले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदुंवर अत्याचार झाले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही पवारांनी म्हटलंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती